Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 18 May 2025
webdunia

पालकमंत्र्यांची यादी जाहीर,अजित पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी

Guardian ministers announced in Maharashtra
, रविवार, 19 जानेवारी 2025 (10:00 IST)
राज्य सरकारने पालक मंत्र्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महायुती सरकारने आता पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मंत्र्यांना एक किंवा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाते. गेल्या महिन्यात राज्यात भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार स्थापन झाल्यापासून या घोषणेची प्रतीक्षा होती.
बीड आणि पुण्याच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचे पद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. 
बीड मध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख ह्त्या प्रकरणानंतर धनजय मुंडे यांच्यावर टीका होत असून त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. या कारणामुळे त्यांचे नाव पलकमंत्र्याच्या यादीतून वगळले आहे. या कारणामुळे बीडच्या पालकमंत्र्याचे पद अजित पवारांना देण्यात आले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार.तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई शहर तसेच ठाण्याचे पालकमंत्री पद दिले आहे. 
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी -
. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
2. ठाणे – एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे
4. पुणे – अजित पवार
5. बीड – अजित पवार
6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती -चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. नाशिक – गिरीश महाजन
12. पालघर – गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ – संजय राठोड
15. मुंबई उपनगर – आशिष शेलार  तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी – उदय सामंत
17. धुळे – जयकुमार रावल
18. जालना – पंकजा मुंडे
19. नांदेड – अतुल सावे
20. चंद्रपूर – अशोक उईके
21.सातारा – शंभूराज देसाई
22. रायगड – आदिती तटकरे
23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
25.सोलापूर – जयकुमार गोरे
26. हिंगोली – नरहरी झिरवाळ
27. भंडारा – संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
29. धाराशिव – प्रताप सरनाईक
30. बुलढाणा – मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग – नितेश राणे
32. अकोला – आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
35. वर्धा – पंकज भोयर
36.परभणी – मेघना बोर्डिकर
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा