Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात मुंबई वगळता ऑक्टोबरमध्ये अघोषित लोडशेडिंग

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (17:29 IST)
राज्यात एन्  ऑक्टोबरमध्ये  जोरदार लोडशेडिंग सुरु केले आहे. कोणत्याही वेळी न सांगता अनेक ठिकाणी अचानक वीजपुरवठा बंद होत असून त्यामुळे अनेक नागरिक वैतागले आहेत. यामध्ये कोळसा उपलब्ध नसल्याने हा प्रकार सुरु झाला आहे. तर विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. राज्यात जवळपास  दीड ते दोन हजार मेगावॅटची तूट आहे.  ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना महावितरणने हा मोठा धक्का दिला आहे.
 

 साडे सतरा हजार मेगावॅट  राज्यात वीज मागणी आहे.  सोळा ते साडे सोळा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होते. तर  वीज गळतीचं प्रमाण, वीज बिलं थकवणाऱ्यांची संख्या या सर्व कारणांमुळे राज्यात लोडशेडिंग सुरु आहे. मात्र याचा त्रास अनेक नागरिकांना भोगावा लागत आहे. न सांगता पूर्व सूचना न देता राज्यात जवळपास  तीन ते साडेचार तासांचं हे भारनियमन सुरु आहे.  ए आणि बी ग्रुप म्हणजे या ग्रुपमधील वीज ग्राहक हे नियमित वीज बिलं भरणारी आणि वीज गळतीचं प्रमाण जवळपास नसलेली आहेत. तर सी आणि डी ग्रुपमधील ग्राहक वीज बिल नियमित न भरणारी आणि वीज गळतीचं प्रमाण अधिक असणारी आहेत.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यातील व्यावसायिकाला तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकल्याबद्दल पाकिस्तानमधून धमकी

दहावीत 75 टक्‍के गुण मिळाल्‍याने विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या, चिंचवडची घटना

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या टी-२०-वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुढील लेख
Show comments