Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
, मंगळवार, 13 एप्रिल 2021 (15:31 IST)
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य लॉकडाऊन करण्याच्या तयारीत ठाकरे सरकार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षिय नेत्यांशी चर्चा केली. तसंच, टास्क फोर्स, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यात जवळपास लॉकडाऊन होणार हे निश्चित झालं आहे. मात्र, कधीपासून जाहीर होणार याबाबत काहीच स्पष्ट नाही आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. कुणाशी चर्चा न करता लॉकडाऊन लावण्याची केंद्रानं केलेली चूक आम्ही करणार नाही, असं देखील अस्लम शेख म्हणाले.
 
सरकार कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करत आहे. पण कुठेही रुग्ण कमी झाल्याचं दिसत नसल्यामुळे लॉकडाऊनबाबतचा निर्णय सरकार आजच घेण्याची शक्यता आहे, असं अस्लम शेख म्हणाले. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केलं आहे. हा लॉकडाउन कधी करायचा याबाबत कालपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अधिक वेळ दवडण्यात अर्थ नसल्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा पर्याय जाहीर करतील : टोपे