Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोणावळा लोकल धावणार, ई-पास दाखविल्यानंतरच प्रवासाचे तिकीट मिळणार

Webdunia
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (09:53 IST)
लोणावळा लोकलसाठी पोलिसांकडून देण्यात आलेले क्युआर कोड आधारित ई-पास दाखविल्यानंतरच प्रवासाचे तिकीट मिळणार आहे. मोबाईल किंवा स्थानकावरील मशीनद्वारे तिकीटाची सुविधा बंद असल्याने मार्गावरील प्रत्येक स्थानकावर तिकीट खिडकीमधूनच तिकीट घ्यावे लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
 
राज्य शासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर येत्या सोमवार (दि. १२) पासून लोणावळा लोकल धावणार आहे. मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या लोकलने प्रवास करता येणार आहे. पुणे व लोणावळ्यातून सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक लोकल सुटणार आहे. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.
 
पुणे पोलिसांकडून लोकलने प्रवास करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्युआरकोड आधारीत ई-पास दिले जाणार आहेत. हे पास दाखविल्यानंतर तिकीट खिडकीवर तिकीट दिले जाणार आहे. ई-पास असल्याशिवाय स्थानकावर प्रवेश दिला जाणार नाही, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर मनसे संतापली, उत्तर भारतीयांबद्दल म्हणाले....

चेन्नई सुपर किंग्जचा सलग चौथा पराभव, पंजाबने पहिला विजय मिळवला

ठाणे : "Excuse me" म्हणण्यावरून वाद झाला, महिलांना पकडून मारहाण करण्यात आली

LIVE: राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर मनसे संतप्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर आग

पुढील लेख
Show comments