Lumpy Skin Disease :सध्या राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यात लम्पी व्हायरस संसर्ग रोग पसरले आहे. अनेक जिल्ह्यात या विषाणूंमुळे जनावरे दगावली आहे. आता बैलपोळाचा सण जवळ आला असून लम्पी व्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना लागत असल्यामुळे या रोग ग्रसित जनावराचा संसर्ग निरोगी आणि सुदृढ जनावरांना होऊ नये या साठी जनावरांना सणानिमित्त एकत्र आणू नये असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना केले आहे.
सध्या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात पसरला आहे. या रोगामुळे जनावरे बाधित होत आहे. सध्या या भागात 60 च्या पुढे जनावरांना या रोगाची लागण लागली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
पशुपालन अधिकाऱ्यांनी बैलपोळ्याच्या सणाला जनावरे एकत्र न आणण्याचे आवाहन केले आहे. जेणे करून इतर निरोगी जनावरांना या रोगाची लागण लागू नये. या रोगामुळे अनेक जनावरे दगावली आहे. यंदाचा पोळा सण साधेपणाने साजरा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जनावरांचे एकत्र मेळावे आयोजित करण्यास देखील बंदी आणण्यात आली आहे. लम्पी रोगाने बाधित असलेल्या जनावरांचे विलीगीकरण करावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.