Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रणशिंग फुंकले आता होणार खरी लढाई महराष्ट्रात महापालिका निवडणुका

maharashatra mahanagarpalia election
, बुधवार, 11 जानेवारी 2017 (16:39 IST)
महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद झाली असून निवडणुकांची तारीख आणि पूर्ण वेळापत्रक आयोगाने जारी केले आहे.यावेळी मुंबई सोबत नाशिक आणि पुणे या महत्वाच्या महापलिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यामध्ये  10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर सर्वांची मतमोजणी  23 फेब्रुवारीला होणार असून  निकाल लागल्यावर आपल्याला कोणाची सत्ता आली हे समजणार आहे.पहिल्या टप्प्याचे मतदान हे १६ फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान २१ फेब्रुवारीला होणार आहे.पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली तर  दुसऱ्या टप्प्यात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुका होणार आहे.नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीला न्यायालयाची स्थगिती असल्याने तेथील निवडणूक जाहीर करता येणार नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
 
दहा महापालिका
1. मुंबई
2. पुणे
3. पिंपरी चिंचवड
4. ठाणे
5. उल्हासनगर
6. नाशिक
7. नागपूर
8. अकोला
9. अमरावती
10. सोलापूर
 
25 जिल्हा परिषद
1. रायगड
2. रत्नागिरी
3. सिंधुदुर्ग
4. पुणे
5. सातारा
6. सांगली
7. सोलापूर
8. कोल्हापूर
9. नाशिक
10. जळगाव
11. अहमदनगर
12. अमरावती
13. बुलढाणा
14. यवतमाळ
15. औरंगाबाद
16. जालना
17. परभणी
18. हिंगोली
19. बीड
20. नांदेड
21. उस्मानाबाद
22. लातूर
23. वर्धा
24. चंद्रपूर
25. गडचिरोली

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर