Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर
, गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (08:35 IST)
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी  यांना 'महाराष्ट्र भूषण'  पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र  सरकारकडून आज 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. तसेच, रेवदंडा येथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेटही घेतली.
 
ते गेली ३० वर्ष निरूपण करत आहेत. तसेच, अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आहेत. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही त्यांनी केलेले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरेंच्या टीकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?