Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra News update
, रविवार, 19 जानेवारी 2025 (16:35 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली जात असून त्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोप केले जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या वर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज रविवारी महाभारताचे उदाहरण देत मी अभिमन्यु नाही तर अर्जुन आहे मला अभिमन्यु सारखे घेरणे अशक्य आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महायुती सरकारने आता पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मंत्र्यांना एक किंवा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाते. गेल्या महिन्यात राज्यात भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार स्थापन झाल्यापासून या घोषणेची प्रतीक्षा होती.

नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देणाऱ्या महाराष्ट्रातील 400 हून अधिक ऐतिहासिक किल्ल्यांना अच्छे दिन येणार आहेत. अतिक्रमणामुळे मरणासन्न झालेल्या किल्ल्यांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या दुर्लक्षाला बळी पडलेले हे किल्ले आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारने अतिक्रमणमुक्त करण्याची तयारी केली आहे. सविस्तर वाचा... 
 

महाराष्ट्रात यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आणि सदस्य संख्या वाढवण्याची रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराचे शिर्डीत आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित होते. मात्र या शिबिरात दोन नेत्यांची सर्वाधिक चर्चा झाली. एक छगन भुजबळ आणि दुसरे मंत्री धनंजय मुंडे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकाम सुरू असलेल्या समुद्राखालील बोगद्याची पाहणी केली आणि प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रकल्पांतर्गत 21 किमी लांबीच्या बोगद्यात ठाणे खाडीखालील सात किमी लांबीचा समावेश आहे. हा बोगदा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी स्टेशन ते शिळफाटा जोडेल. हा समुद्राखालचा बोगदा देशातील पहिलाच बोगदा आहे.सविस्तर वाचा...

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा मूळचा बांगलादेशचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.पाच-सहा महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता. जो हाऊस किपिंग कंपनीत काम करतो.सविस्तर वाचा... 
 

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावानजीक शिवशाही बस ने पेट घेतला.आज रविवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.शिवशाहीची बस सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना उर्से टोलनाक्याच्या पुढे गेल्यानंतर ओझर्डे गावाजवळ आल्यावर बस ने अचानक पेट घेतला. सविस्तर वाचा... 
 

व्याज देऊन आणि जमिनीची नोंद करूनही सावकारांनी आणखी पैशांची मागणी केल्याने कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या घटनेत आई अणि मुलाचा मृत्यु झाला तर पति ने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शुभांगी वैभव हांडे(36), धनराज वैभव हांडे(9) अशी मृतांची नावे आहे.  सविस्तर वाचा... 
 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड आयकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी19 रोजी पहाटे मुंबईहून निघाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात फडणवीस राज्यातील नवीन गुंतवणुकीबाबत $1 ट्रिलियनच्या अनेक करारांवर स्वाक्षरी करून अर्थव्यवस्थेला लक्ष्य करणार आहेत.  सविस्तर वाचा...

बीड येथे आज सकाळी भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. हे तरुण पोलिस भरतीची तयारी करत होते. या अपघातामुळे पुन्हा एकदा बीड चर्चेत आले आहे.   

राज्यात पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे देखील नाव असून त्यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे. या जबाबदारी सोबत त्यांच्या समोर आव्हाने देखील आहेत.   सविस्तर वाचा... 
 

बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली जात असून त्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोप केले जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या वर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज रविवारी महाभारताचे उदाहरण देत मी अभिमन्यु नाही तर अर्जुन आहे मला अभिमन्यु सारखे घेरणे अशक्य आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया, मी अर्जुन आहे म्हणाले