Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात डंपरखाली अडकून दोन तरुणींचा दुर्दैवी अंत

maharashtra
, शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (21:43 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: पुण्यातील हिंजवडी-माण रस्त्यावर वडजाई नगर कॉर्नर येथे रेडीमिक्स डंपर पलटी होऊन त्यात अडकून दोन तरुणींचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. रेडीमिक्सने भरलेला डंपर हिंजवडीतून महाळुंगेच्या दिशेला चालला होता.वडजाई नगर कॉर्नर येथे वळण घेतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि डंपर पलटी झाला. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी निवडणुकीत आपली चूक आधीच मान्य केली होती. तेव्हापासून काका-पुतण्यांमधील जवळीक वाढत असल्याचे दिसून येते. अलिकडेच एका कार्यक्रमात दोघेही स्टेजवर एकत्र दिसले. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहे, जिथे ते महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे दरवाजे उघडत आहे. यामुळे महाराष्ट्र गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनत आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इशारा दिला की जर त्यांनी त्यांच्या पक्षावर आणि महायुतीवर टीका करणे थांबवले नाही तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सध्याच्या 20 पैकी फक्त दोनच आमदार टिकतील. सविस्तर वाचा

महाआघाडीत बंडखोर नेत्यांच्या परतण्याबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहे. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्या बंडखोर नेत्यांना प्रवेश मिळणार आहे याचा खुलासा केला आहे. सविस्तर वाचा

सुरक्षा व्यवस्थेवरून मुंबई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबईत पुन्हा एकदा 20 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी ऑटोचालकाला अटक केली आहे. सविस्तर वाचा

गुरुवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्रातील दोन्ही शिवसेनेने एकमेकांना आव्हान दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरही निशाणा साधला आणि त्यांच्यावर हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. सविस्तर वाचा

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगले. तसेच  बीकेसी मैदानावर शिवोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. सविस्तर वाचा

पाचोरा तहसीलमधील वडगाव बुद्रुकजवळ झालेल्या या दुर्दैवी रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 11 जणांची ओळख पटली आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या कुटुंबियांना 1.5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातून स्फोट झाल्याची बातमी धक्कदायक बातमी येत आहे. भंडारा येथील एका आयुध कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सविस्तर वाचा

महाराष्ट्रातील मुंबई मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशी महिला देखील राज्यातील बहुचर्चित योजना, लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेच्या शिंदे गटात सर्व काही ठीक नाही. उदय सामंत शिवसेनेला दोन गटात विभागू शकतात. शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्याचा दावा केला आणि महाराष्ट्राला त्यांच्या पक्षातून तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल असे सांगितले. सविस्तर वाचा

केरळ दौऱ्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत आज त्यांच्या भिवंडी दौऱ्यावर आहेत. 13 जानेवारी रोजी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मोहन भागवत चर्चेत आले आहेत. आता ते आरएसएसच्या शाखांना भेट देणार आहेत.सविस्तर वाचा... 
 

भंडारा अपघातावर देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केले,पटोले यांनी सरकारवर साधला निशाणा 
भंडारा जिल्ह्यात एका आयुध निर्माणीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला असून या अपघातात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थली दाखल झाल्यासून बचावकार्य सुरु झाले आहे. या मध्ये आता पर्यन्त पाच  कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.सविस्तर वाचा...  
 

संजय राउत यांच्या तीसरा उपमुख्यमंत्री वक्तव्यावर शुक्रवारी किरीट सोमैया यांनी टोला लगावला आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे. ते त्यांच्यापैकी कोणीतरी असावे.या वर किरीट सोमय्या म्हणाले, संजय राउत आज बोलतात आणि उद्या विसरतात. त्यांना त्यांचेच म्हटलेले लक्षात ठेवता येत नाही. सविस्तर वाचा...

राज्यात राज्य सरकार आता पैसे उभारण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबवत आहे. आता महाराष्ट्रात सरकारी बसचा प्रवास महागणार आहे. सरकारी बसच्या तिकिटांच्या दरात आजपासून 15 टक्के वाढ करण्यात आली. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. सविस्तर वाचा...  
 

इयरफोन लावून वाहन चालवणे धोकादायक आहे. तसेच चालताना देखील इयरफोन लावून चालणे हे धोकादायक असू शकते. अनेकदा या मुळे अपघात घडतात. रेलवे रूळ ओलांडू नका असे करणे धोकादायक होऊ शकते असे वारंवार रेलवे प्रशासन सूचना देतात तरीही काही जण रेल्वेचे रुळ ओलांडतात.असेच काहीसे घडले आहे पालघर येथे. सविस्तर वाचा... 

अभिनेता सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला 29 जानेवारीपर्यन्त पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. आरोपीची बाजू मांडणारे वकील संदीप शेरख़ाने यांनी सांगितले की, आरोपीचा चेहरा वेगळा असून जुळत नाही. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले.सविस्तर वाचा...  
 

महाराष्ट्रात लोक जास्तीत जास्त वेळ ट्रॅफिक मध्ये घालवतात.  राज्यातील वाहतूक समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सरकार एक नवीन धोरण आणण्याचा विचार करत आहे. या धोरणाद्वारे, कार खरेदी करण्यापूर्वी डीलर्सना पार्किंगच्या जागेची माहिती देणे बंधनकारक असेल. याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईतील वाहतूक कमी करण्यासाठी सरकार असा निर्णय घेत आहे.
सविस्तर वाचा...

अभिनेता सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला 29 जानेवारीपर्यन्त पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. आरोपीची बाजू मांडणारे वकील संदीप शेरख़ाने यांनी सांगितले की, आरोपीचा चेहरा वेगळा असून जुळत नाही. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सविस्तर वाचा...  
 

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या बसेस बरोबरच मुंबईत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी प्रवासही महागणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन बसच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच मुंबई महानगर क्षेत्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने एमएसआरटीसी बसच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सविस्तर वाचा... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बस नंतर मुंबईत आता ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ