Dharma Sangrah
✕

By-election Results: बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर तर राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कार्डिले आघाडीवर

वेबदुनिया न्यूज टीम
सोमवार, 4 मे 2026 (11:50 IST)
पाच राज्यांमधील सात विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुका प्रामुख्याने विद्यमान आमदारांच्या निधनामुळे झाल्या होत्या. यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यांचे या वर्षी जानेवारीमध्ये विमान अपघातात दुःखद निधन झाले. या जागांसाठी ९ आणि २३ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते.
ALSO READ: Baramati and Rahuri By-Election Result मतमोजणीला सुरुवात, महायुती की महाविकास आघाडी? संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे
महाराष्ट्राच्या पोटनिवडणुकांमध्ये कोण आघाडीवर आहे?
महाराष्ट्रामध्ये दोन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या, ज्यात बारामती ही सर्वात चुरशीची जागा ठरली आहे.
पवार घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार आघाडीवर आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या एकमेव उमेदवार आहे.

राहुरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अक्षय कार्डिले आघाडीवर आहे.
महाराष्ट्रातील राहुरी विधानसभा जागा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भाजप आमदार शिवाजी कार्डिले यांच्या निधनानंतर रिक्त आहे. त्यांचे पुत्र अक्षय कार्डिले हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार गोविंद मोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चाळके उभे आहे.
ALSO READ: इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची मांदियाळी; राजकीय वर्तुळात चर्चा
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: सोमवारी पुणे जिल्हा परिषदेत अमित शाह अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील

दिवाळीनंतर मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा फटका! भाजीपाल्याचे दर वाढले, १० दिवसांत दुधीच्या भावात दुप्पट वाढ; पाहा APMC चे नवे दर

दिवाळीनंतर मुंबई-ठाण्यात भाज्यांचे दर कडाडले! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या सर्व हॉकी सामन्यांसाठी मोफत प्रवेश जाहीर

शेख हसीना बांगलादेशला परतणार का, भारताने दोन अटी ठेवल्या

पुढील लेख
Show comments