suvichar

उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, गृह मंत्रालय शिवसेनेकडे

Webdunia
गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (18:30 IST)
महाविकास आघाडी सरकारमधील खातेवाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शपथ घेतल्या सहा मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे.
 
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खातं सोपविण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे नगरविकास, पर्यावरण-वने, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम ही खातीही सोपविण्यात आली आहेत. सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग आणि परिवहन मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रिपद सोपविण्यात आलं आहे, तर छगन भुजबळांकडे जलसंपदा तसंच ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
काँग्रेसच्या वाट्याला महसूल मंत्रिपद तसंच सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास ही खाती आली आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद तसंच ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण ही खाती देण्यात आली आहेत. नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास खातं सोपविण्यात आलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

LIVE: सुरगाणा, नाशिक आणि डहाणू, पालघर येथे भूकंपाचे सलग चार धक्के जाणवले

नीट पेपरफुटी प्रकरणात नागपूर आणि संभाजीनगर येथे विशेष न्यायालये स्थापन होणार

आधार कार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे? हे अपडेट्स न केल्यास अनेक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

पुढील लेख
Show comments