Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मातोश्रीवर धमकीचा फोन, तपास सुरक्षा यंत्रणा सर्तक

Webdunia
सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (08:33 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी धमकीचा फोन आला. त्यानंतर आता, मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईतून धमकीचा फोन आल्यानंतर, धमकी देणारा कोण होता, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरु आहे. उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर आलेल्या फोननंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी, दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु शकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
मातोश्री हे मराठी माणसाचं सन्मानाचं स्थान आहे. पाकिस्तानदेखील मातोश्रीचं वाकड करु शकत नाही. दाऊद हा दुसऱ्याचा आश्रय घेऊन राहतो. पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. 
 
शिवसेनेसह काँग्रेसच्या नेत्यांनेही मातोश्रीवर आलेल्या फोननंतर मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे. अशा धमक्यांना सरकार घाबरणार नसून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

जालन्यात 'शिव महापुराण' दरम्यान मंडप कोसळला,25 जण जखमी

महाविकास आघाडी उद्धव यांना सत्तेवरून काढणार ! रामदास आठवले यांनी केला मोठा दावा

Russia Ukraine War :ईस्टरला युद्धबंदी जाहीर होऊनही रशियाचे हल्ले सुरूच', अध्यक्ष झेलेन्स्की यांचा आरोप

MI vs CSK : मुंबई इंडियन्सने सीएसकेचा नऊ विकेट्सने पराभव केला

IPL 2025: आरसीबीने पंजाबकडून बदला घेतला, परदेशात सलग पाचवा सामना जिंकला

पुढील लेख
Show comments