Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेस महाराष्ट्र सचिव संजय चौपाने यांचा अपघातात मृत्यू

maharashtra-congress-secretary-sanjay-chaupane-passed-away
, सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:17 IST)

औरंगाबाद-गंगापूर रोडवरील भेंडाला फाटा येथे बस-स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संजय चौपाने यांचा जागीच मृत्यू झाला. याच अपघातात ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, रमाकांत म्हात्रे, बलदिप सिंह बिस्त जखमी झाले आहेत. संजय चौपाने हे औरंगाबादमध्ये इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या कार्यक्रमाला आले होते.

इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याची सुरुवात औरंगाबादेतून करण्यात आली आहे. या सोहळ्यात काँग्रेसचे गुलामनबी आझाद, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मोहन प्रकाश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिजबूलचा कमांडर यासीन इट्टूचा खात्मा