Maharashtra Gram Panchayat Elections 2023 : राज्यात आज 2 हजार 369 ग्राम पंचायतीसाठी मतदान होत आहे. 2950 सदस्यपदांसाठी तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका देखील आज होणार आहे. सकाळी 7:30 पासून ते संध्याकाळी 5:30 वाजे पर्यंत मतदान होणार आहे. मत मोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार.
नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली आणि गोंदिया भागात मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजे पर्यंतच आहे. तर या भागात मतदान मोजणी 7 नोव्हेंबर 2023 रोजी होणार.
कोणत्या जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार चला जाणून घ्या.
जिल्हे व ग्रामपंचायतींची एकूण संख्या
ठाणे – 61
रायगड – 210
रत्नागिरी – 14
पालघर – 51
धुळे – 31
सिंधुदुर्ग – 24
नाशिक – 48
जळगाव – 168
अहमदनगर – 194
नंदुरबार – 16
पुणे – 231
सोलापूर – 109
सातारा – 133
कोल्हापूर – 89
सांगली – 94
छत्रपती संभाजीनगर – 16
बीड – 186
नांदेड – 25
धाराशिव – 6
Edited by - Priya Dixit