Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र: गुप्त धनाचा लोभ, नरबळी देण्यासाठी चालली होती अघोरी पूजा

महाराष्ट्र: गुप्त धनाचा लोभ, नरबळी देण्यासाठी चालली होती अघोरी पूजा
, गुरूवार, 4 जुलै 2024 (10:35 IST)
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तहसील मध्ये गुप्त धन मिळावे म्हणून लोभामध्ये नरबळी देण्यासाठी अघोरी पूजा सुरु होती. याची माहिती मिळताच गावाचे सरपंचानी पोलिसांना सूचना दिली व सर्व प्रकरण उघडकीस आले. 
 
कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव (तहसील राधानगरी) गावामध्ये नरबळी देण्याचे कारण असे आहे की तुम्हाला ऐकून धक्काच बसेल. गावामध्ये एका घरात एक मोठा खड्डा खोदून पूजा सुरु होती. याची माहिती मिळताच गावाच्या सरपंचानी पोलिसांना सूचना दिली आणि हे प्रकरण उघडकीस आणले. सांगितले जाते आहे की, अघोरी पूजा करणाऱ्यांसोबत घरमालकाला राधानगरी पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. सांगितले जाते आहे की गुप्तधनाच्या मोहामध्ये हा नरबळी दिला जाणार होता. 
 
गावाचे सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसारमागील काही दिवसांपासून या घरामध्ये धार्मिक अनुष्ठान केले जात होते. प्रकरण समोर आले तेव्हा समजले की, मांत्रिक केळाच्या पानावर चटई ठेऊन हळद-कुंकू, सुपारी, नारळाचे पान, लिंबामध्ये खिळे लावून पूजा करीत होता. आरोपी गळ्यामध्ये माळा घालून मंत्र उच्चारत होता.  
 
आतील खोलीमध्ये गेल्यावर दिसले की, खोल खड्डा खोदलेला होता. जेव्हा या आरोपीला विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की गुप्त धन मिळवण्यासाठी ही पूजा सुरु आहे. तसेच आरोपीने सरपंच आणि सदस्यांना धमकी दिली की निघून जा नाही तर जीव घेईन. यानंतर सरपंच आणि सदस्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवली व पोलिसांनी या आरोपींना मध्यरात्री ताब्यात घेतले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी