Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र : शरद पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागितली माफी, म्हणाले मनुस्मृती विरोध करतांना चुकून फाडला डॉ. आंबेडकरांचा फोटो

Webdunia
गुरूवार, 30 मे 2024 (10:13 IST)
महाराष्ट्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता या घटनेची बाजू मांडत त्यांनी लोकांची माफी मागितली. ते म्हणाले की, महाडच्या कीर्ती स्तंभावर मनुस्मृती जाळून विरोध केला होता. या दरम्यान माझ्याकडून एक चुकी झाली. काही कार्यकर्ते मनुस्मुर्तीचा विरोध करावीत काही पोस्टर घेऊन आलेत. त्यावर बाबासाहेब यांचा फोटो होता. जो मी चुकीने फाडला. 
 
महारष्ट्रातील शालेय पाठ्यक्रमात मनुस्मृती मधील श्लोक सहभागी करण्यावरून या विरोधात वाद सुरु आहे. या दरम्यान एनसीपी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर पूर्ण प्रदेशमध्ये त्यांचा विरोध केला गेला. आपल्या विरुद्ध विरोध वाढतांना पाहून त्यांनी लोकांची माफी मागितली. 
 
जितेंद्र आव्हाड लोकांची माफी मागत म्हणाले की, सरकार मनुस्मृतीमधील श्लोक शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सहभागी करीत आहे. या विरोधात त्यांनी महाड कीर्ती स्तंभावर मनुस्मृती जाळून विरोध केला. या दरम्यान त्यान्च्याकडून चुकून बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला. ते म्हणाले की माझ्याकडून चुकून बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला याकरिता मी सार्वजनिक रूपाने माफी मागतो. तसेच ते म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून बाबासाहेबांच्या विचारांवर चालत आहे. मला विश्वास आहे की, सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील. 

Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments