Festival Posters
✕

Maharashtra MLC Election Result: ५ मतदारसंघांच्या निकालाची रणधुमाळी; ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Webdunia
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 (15:26 IST)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज २७ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. २३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज या ५ मतदारसंघांचे निकाल जाहीर होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीची (मविआ) प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
मतदारसंघ आणि निवडणूक रिंगण: ३ पदवीधर (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) आणि २ शिक्षक (पुणे, अमरावती) अशा एकूण ५ जागांसाठी १८२ उमेदवारांचे भवितव्य ठरत आहे.
 
अमरावती शिक्षक मतदारसंघ: इथे पहिल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किरण सरनाईक मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे सध्या पिछाडीवर आहे.
ALSO READ: गडचिरोलीत शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, २२५ नवीन शेतकरी पात्र ठरले
नागपूर पदवीधर मतदारसंघ: प्रारंभिक फेरीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी घेतली आहे, मात्र काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्याशी त्यांची चुरशीची लढत सुरू आहे.
 
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर: पोस्टल मतांच्या सुरुवातीच्या मोजणीत मविआचे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान पार पडल्यामुळे पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार आहे.
ALSO READ: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे; आज उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Related News

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

राज्यात १२ वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय एकट्याने लिफ्ट किंवा एस्केलेटर वापरण्यास सक्त मनाई

अक्कलकोटमध्ये एफडीएचा मोठा छापा; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, चार दुकानांना टाळे

भाच्यासोबतच्या अनैतिक संबंधांतून आत्याची निर्घृण हत्या; दोन बहिणींसह चौघे अटकेत

LIVE: अदानींच्या तराली प्रकल्पावर वन विभागाची कारवाई; १,५०० मेगावॅटचा प्रकल्प स्थगित

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणखी २ हजारांची मदत मिळण्याची शक्यता; राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष

पुढील लेख
Show comments