Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (17:58 IST)
महाराष्ट्रात मध्यप्रदेशाच्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे उध्दिष्टय राज्यातील लाखो महिलांना आर्थिक सहाय्य देऊन आर्थिक दृष्टया सक्षम करणे आहे. या योजने अंतर्गत राज्य सरकार लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवणार आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. या योजनेला विरोधी पक्षाने नौटंकी असल्याचं म्हटलं आहे. 

या योजने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, राज्यातील नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजना या कायमस्वरूपी आहे. या बंद होणार नाही. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. तसेच महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत तीन मोफत सिलिंडर आणि मासिक मदत केल्याची तरतूद अर्थ संकल्पात केली आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्व महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदे सरकारची ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. ही योजना येत्या 2 ते 3 महिन्यात बंद होणार उद्धव ठाकरे यांनी असा दावा केला. तसेच यंदा सत्ताधारी आघाडीचे सरकार निवडणुकीत विजयी होणार नाही.

या वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, महिलांना दरमहा 1500 रुपये आणि वार्षिक 18,000 रुपये देण्याची योजना, तसेच तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना ही भगिनींसाठी रक्षाबंधन भेट आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही दीर्घकालीन योजना आहे.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दसऱ्याला घरी झाडू आणा, सौभाग्याचे दरवाजे उघडा !

रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला सांगितलेली ३ रहस्ये - आजही तितकीच प्रासंगिक

घरात ही दोन झाडे सोबत लावल्याने नक्कीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

कडूलिंबामुळे स्कॅल्पच्या संसर्गापासून सुटका मिळते, कसे वापराल

मासे खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नका, ते घातक ठरू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई विमानतळावर 'हायड्रोपोनिक' गांजा, परकीय चलन आणि सोने जप्त

दिवाळीपूर्वी पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकार निधी वाटप करत आहे- उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई विमानतळावर, ड्रग्ज, सोने आणि परकीय चलन जप्त; तीन प्रवाशांनाअटक

पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला, १० जणांना अटक

ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक, उल्हासनगरमधील विविध विकास मुद्द्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुढील लेख
Show comments