सध्या पावसाचे जोरदार सत्र सुरु आहे. नदी नाले तुडुंब भरले आहे. धबधबे वाहत आहे. असं म्हणतात की आग आणि पाणीशी कधीही खेळू नये. पाण्याशी खेळणे एका तरुणाला चांगलंच भोवलं आहे. मुंबईच्या मालाड पूर्व येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणाऱ्या धबधब्यात एक 25 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. चंदन शाह असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडणाऱ्या धबधब्यात एक तरुण मंदधुंध अवस्थेत मध्यभागी जाऊन बसला. त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हात निसटला आणि तो धबधब्यात वाहून गेला.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याचा शोधाशोध सुरु केला. अद्याप या तरुणाचा शोध लागलेला नाही.
धबधब्याच्या पाण्याच्या वेगाने तो वाहून गेला आणि त्याच्या बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहे.