suvichar

यंदा पाऊस चार दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होणार

Webdunia
शनिवार, 19 मे 2018 (09:22 IST)
यंदा मान्सून २९ मे ला  केरळात धडकणार असून महाराष्ट्रासाठी त्याने ५ जूनचा वायदा दिलेला आहे. ५ जून रोजी मान्सून कोकण किनारपट्टीसह मुंबई व्यापेल. म्हणजेच यंदा पाऊस चार दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे.  केरळात आगमन झाल्यानंतर मान्सून ५ जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल आणि १० जून रोजी मुंबईसह राज्यभरात आपले हातपाय पसरेल असा अंदाज आहे. 
 

अरबी समुद्रात तयार झालेले वादळ ओमानकडे सरकले नसते तर मान्सूनचा वेग वाढला असता आणि तो २८ मेअगोदरच केरळमध्ये दाखल झाला असता. त्यानंतर तो महाराष्ट्रात वेळेच्या बराच आधी दाखल झाला असता अशी माहिती हवामान विभागाचे वरीष्ठ वैज्ञानिक ए.के.श्रीवास्तव यांनी दिली.

याआधी हवामान आणि कृषीतज्ञांनी मान्सून२८ मे रोजी केरळात दाखल होईल आणि तीन दिवस आधी म्हणजेच ४ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. म्हणजेच मान्सून ३ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होणार होता. परंतु,आता मान्सून ४ दिवस आधी म्हणजेच ५ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे.
मान्सूनचे बदललेले वेळापत्रक
अंदमान – २० मे
केरळ – २९ मे
कोकण किनारपट्टी – ५ जून 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

तिकीटशिवाय प्रवास केल्यास दुप्पट दंड आकारला जाईल, रेल्वेने १ जुलै पासून हे नियम बदलले

LIVE: फडणवीस यांनी मोठी घोषणा केली: सक्तीचे धर्मांतराविरोधी कायदा येणार

१ जुलै पासून खिशावर मोठा परिणाम होणार, हे नियम बदलणार; १० मोठ्या बदलांविषयी जाणून घ्या

महाराष्ट्रात सक्तीच्या धर्मांतराविरोधी कायदा येणार, अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १६ पर्यंत कमी केले जाणार

मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई, व्हॉट्सॲप डीपी घोटाळ्याचा पर्दाफाश

पुढील लेख
Show comments