Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हादरवून टाकणारी बातमी! म्हैस, रेड्याच्या चरबीपासून तूप निर्मिती; पोलिसांकडून कारखाना उद्ध्वस्त

Webdunia
भिवंडीत म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर लोकांच्या जिवाशी खेळ मांडणारा हा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भिवंडी महापालिका प्रशासनाकडून स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  भिवंडी  शहरातील इदगाह साल्टर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात शहरातील खाण्यासाठी कापण्यात आलेल्या म्हशी रेड्याच्या चरबीपासून तूप बनविण्याचे काम सुरू होते. म्हशीच्या चरबीपासून तयार करण्यात आलेल्या तुपाचा विविध खानावळी आणि हॉटेल्सना पुरवठा सुरू होता. भिवंडी महापालिका प्रशासनाला याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानं पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी आपत्कालीन विभागाच्या पथकासह या कारखान्यावर छापा टाकला.
 
या छाप्यात म्हशीच्या चरबीपासून बनवण्यात आलेल्या तुपाचे डबे आणि तूप बनवण्याच साहित्य जप्त करण्यात आलं.  पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.
 
दरम्यान स्वस्त आणि भेसळयुक्त तुपामुळे नागरिकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आगहे. त्यामुळे खात्रीच्या ठिकाणावरुन तूप किंवा अन्य पदार्थांची खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

सर्वपक्षीय शिष्टमंडळावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

भारताच्या युकी भांब्रीने जोडीदार गॅलोवेसह शानदार कामगिरी उपांत्यफेरीत प्रवेश केला

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments