Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महापालिका निवडणुकीपूर्वी काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला

eknath shinde
, गुरूवार, 30 जानेवारी 2025 (09:52 IST)
Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील बीएमसी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यासाठी अनेक नगरसेवकांनी आपला मार्ग बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितनुसार  महापालिका निवडणुका येत आहे, अशा परिस्थितीत सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विजयासाठी त्यांचा आवडता पक्ष शोधला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पक्ष बदलाचा टप्पा सुरू झाला आहे. माजी नगरसेवक इंदुबाई नागरे, समिना मेमन आणि विक्रम नागरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 
इंदुबाई नागरे या सातपूरमधून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका आहे. राष्ट्रवादीच्या समीना मेमन या सलग तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहे, ज्या अखिल भारतीय मेमन जमातच्या राष्ट्रीय सचिव आहे. विक्रम नागरे यांनी भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सचिव म्हणून काम पाहिले आहे. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख राजू लवाटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, हर्षदा गायकर, योगेश म्हस्के उपस्थित होते.दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेल्या माजी नगरसेविका आणि प्रदेश पदाधिकारी डॉ. हेमलता पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी सोमवारी संध्याकाळी शहरात पसरली. पण डॉ. हेमलता पाटील म्हणाल्या की त्या अद्याप कोणत्याही पक्षात सामील झालेल्या नाहीत.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात 2 बांगलादेशींना अटक, एटीएसने छापे टाकले