Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाशिवरात्रीला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील अनेक तीर्थस्थाने बंद

महाशिवरात्रीला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील अनेक तीर्थस्थाने बंद
, बुधवार, 10 मार्च 2021 (16:26 IST)
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. त्यामुळे मास्क लावा, गर्दी करू नका, अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार जनतेला देण्यात येत आहेत. त्यातच उद्या ११ तारखेला महाशिवरात्री असल्याने गर्दी टाळण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनसाठी भाविक येत असतात, त्यामुळे गर्दी होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी याठिकाणी 12 तारखेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. जमाबंदीचा कायदा तोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच खंडेरायाच्या मंदिरावर पाताळ लोक पृथ्वी व अवकाशातील लिंग दर्शनासाठी खंडोबा मंदिरावर सक्त बंदी करण्यात आली आहे. तसेच जेजुरी बाहेरील येणाऱ्यांनादेखील बंदी करण्यात आली आहे. हॉटेल लॉज यांना देखील मुक्कामी बुकिंग न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महाशिवरात्रीला बारामती तालुक्यातील सोनेश्वर मंदिर बंद राहणार आहे. बारामती प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने बारामती तालुक्यातील कऱ्हा निरा नदीच्या संगमावर असलेल्या सोनगांव येथील सोनेश्वर मंदिर हे तिर्थक्षेत्र महाशिवरात्रीनिमित्त बंद राहणार आहे. यामुळे भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात येऊ नये असे आव्हान देवस्थान आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि जिल्ह्यातील इतर महादेवाची देवस्थाने 3 दिवस बंद राहणार आहेत. ११ तारखेला महाशिवरात्री असल्याने दिनांक १०,११ आणि १२ हे तीन दिवस महादेवाची मंदिरे बंद राहणार आहेत. महाशिवरात्रीला श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि शिखर शिंगणापूर या महादेवाच्या मंदिरात मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महादेवाची मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गेल्या १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद, संकटात पंकजा मुंडे