Festival Posters

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

Webdunia
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (10:17 IST)
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. हा अहवाल सकारात्मक असल्यास या अहवालाच्या आधारे राज्य सरकार मराठा आरक्षणाचा नवीन कायदा करू शकते.
 
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 15 नोव्हेंबरचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर न्या. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबत उत्सुकता वाढली आहे. सोमवार आणि मंगळवारी आयोग पुण्यात होणार्‍या मॅरेथॉन बैठकांमध्ये चर्चा करून अहवालाला अंतिम रूप देणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. हा अहवाल सकारात्मक असेल, तर विधिमंडळात नवा कायदा केला जाऊ शकतो.
 
अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 19 नोव्हेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनातच हा कायदा केला जाईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून १४.५८ कोटी मंजूर

LIVE: मुंबईत जैन साधू-साध्वींच्या मार्गावरील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद वाढला

World Wind Day 2026 : 15 जून जागतिक पवन दिवस

World Elder Abuse Awareness Day 2026 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दुर्व्यवहार जागरूकता दिवस

महाराष्ट्रात एकल महिला धोरण तयार करण्याची तयारी सुरू; जनतेच्या पाठिंब्याचे आवाहन

पुढील लेख
Show comments