rashifal-2026

मराठा आरक्षणाची याचिका हायकोर्टाने काढली निकाली

Webdunia
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (16:30 IST)
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दाखल झालेली याचिका मुंबई हायकोर्टाने बुधवारी निकाली काढली. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला असून याचिकेचा मूळ हेतू साध्य झाल्याचे याचिकाकर्त्यांनी कोर्टात सांगितले. तर राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती हायकोर्टात दिली. यानंतर हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली आहे.
 
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात विनोद पाटील यांनी याचिका दाखल केली होती. मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक सुरु व्हायच्या आत घ्यावा, जेणेकरुन लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांच्यावतीने दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.
 
आरक्षणासंदर्भात कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालही कोर्टात सादर करण्यात आला. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

देशातील पहिले रजोनिवृत्ती क्लिनिक महाराष्ट्रात उघडले, महिलांना या सुविधा मिळतील

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू, राज्यात शोककळा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

पुढील लेख
Show comments