suvichar

११ डिसेंबर ला वाशीत रंगणार मराठी गजल मुशायरा

Webdunia
शनिवार, 10 डिसेंबर 2016 (10:40 IST)

रम्य संध्याकाळ, गुलाबी थंडी आणि भावपुर्ण आशयघन मराठी गजलांचा नजराणा रसिक श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. संस्कार भारती, वाशी समिती ने मराठी गजल मुशायरा 'गजलांकित' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.  रविवार ११ डिसेंबर ला सायंकाळी ६ वाजता कन्नड संघ टेरेस, वाशी, सेक्टर ९, नवी मुंबई येथे रसिक श्रोत्यांना ह्या गजल कार्यक्रमाची मैफल विनामुल्य अनुभवता येणार आहे.

ह्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेल्या कवींचा गजल मुशायरा ऐकावयास मिळणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमात जनार्दन केशव म्हात्रे (ठाणे), आनंद पेंढारकर (सावंतवाडी), विशाल राजगुरू (सोलापूर),  प्रथमेश तुगांवकर (उस्मानाबाद) या कवींसह ज्येष्ठ गजलकार व समीक्षक डॉ. राम पंडित यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रमाचे निवेदन कवियित्री यामिनी दळवी करणार आहे. एकापेक्षा एक अशा गजलांची शब्द मैफल ऐकण्याची पर्वणी आणि संधी रसिक श्रोत्यांनी जरूर अनुभवावी.

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कर्जमाफी योजनेत सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला

श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल, चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताकीद दिली

नाशिकमध्ये भीषण अपघात; दोन ट्रकने कारला धडक दिल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

लेह-लडाखमध्ये भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील दोन वकिलांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments