suvichar

लग्नात जेवताय सावधान अनेकांना विषबाधा

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (15:02 IST)
सध्या लग्नाच्या तिथी जोरात आहेत. अनेक ठिकाणी मंगलकार्यालये गर्दीने भरून गेली असून, अनेक ठिकाणी लग्न होत आहेत. मात्र जेवण करतांना सावधानता बाळगली पाहिजे, कारण सांगली येथील तासगाव भागातील लग्न समारंभात केलेल्या जेवणातून 100 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत  तासगाव येथील एका मंगल कार्यालयात दोन दिवसांपूर्वी आरवडे आणि येळावी कुटुंबीयांचा लग्नसोहळा पार पडला होता. त्यामध्ये ही घटना घडली आहे.  या लग्नात जेवण केल्यानंतर काहींना उलटी आणि जुलाबाचा प्रचंड  त्रास झाला, त्यामुळे काही लोकांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काहींना प्राथमिक आरोग्य केंद्र आरवडे येथे दाखल करण्यात आल आहे. वैद्यकीय अधिकारी कमी पडू लागल्याने मांजर्डे, डोर्ली आणि गौरगाव येथून वैद्यकीय मदत मागवण्यात आली असून आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे. लग्नात जेवणाबरोबरच मठ्ठा देण्यात आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांनी मठ्ठा मोठ्या प्रमाणात प्यायला होता. पण मठ्ठा बनवल्यानंतर तो बनवण्यासाठी वापरलेलं पाणी आणि त्यात टाकला गेलेला बर्फ हा दूषित असल्यामुळेच हा प्रकार झाला असवा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. त्यामुळे जेवण करताय तर लक्ष द्या, उगीच मिळतय म्हणून, फुकट कितीही खाऊ नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी: नीट पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

LIVE: ज्यांना जायचे आहे, त्यांनी आनंदाने जावे, उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

रोहित पवार यांचे उपोषण संपले; शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा २२ जून रोजी सोडवला जाणार

आशियाई खेळांसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा, सुमित-सहाजा नेतृत्व करणार

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत होणार

पुढील लेख
Show comments