Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2 चिमुकल्यांसह आईचा शेवट

End of mother with 2 toddlers
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (14:47 IST)
सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा (Vita) याठिकाणी कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात सोनाली हात्तेकर या विवाहित महिलेने आपली चार वर्षाची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
 
सोमवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
 
सोनाली बिहुदेव हत्तेकर असं आत्महत्या करणाऱ्या 26 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या विटा येथील शाहूनगर परिसरातील रहिवासी आहेत. मृत सोनाली यांनी आपली चार वर्षांची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी मारली आहे. या दुर्दैवी घटनेच तिघांचाही नाकातोंडात पाणी शिरून मृत्यू झाला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनाली हत्तेकर या शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा क्र. 13 परिसरात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला होत्या. घटनेच्या दिवशी सोमवारी सकाळी सोनाली आपल्या दोन्ही मुलांसह घरातून बाहेर पडल्या होत्या. दोन्ही मुलं आणि सोनाली घरातून गायब झाल्यानं कुटुंबीयांनी तिघांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथील राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुनील जाखड यांच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ