Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती संभाजीनगरमध्ये कार अपघातात तिघांचा मृत्यू

accident
, बुधवार, 25 जून 2025 (15:06 IST)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. 
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फुलंब्री तहसीलमधील बिल्डा गावाजवळ छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी चारचाकी गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटली. कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. सय्यद मारुफ,अराफत बागवान  आणि रेहान सय्यद अशी त्यांची ओळख पटली आहे. हे सर्व स्थानिक रहिवासी होते. इतर दोघे जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालेगावमध्ये भटक्या बैलांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी