Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया एरोस्पेस प्लांटमध्ये भीषण आग, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

fire
, बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (08:15 IST)
अमेरिकेतील एका एरोस्पेस उत्पादकाच्या कारखान्यात भीषण आग लागली. मंगळवारी स्थानिक शाळा बंद ठेवाव्या लागल्या यावरून आगीची तीव्रता किती होती याचा अंदाज येतो. स्थानिक रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. वृत्तसंस्था एपी ने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग फिलाडेल्फियाच्या उत्तरेला लागली. 
सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 9:30 वाजता जेनकिनटाउन येथील एरोस्पेस उत्पादक एसपीएस टेक्नॉलॉजीजच्या प्लांटमध्ये भीषण आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर गोदामात आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.
ALSO READ: मालीमध्ये सोन्याची खाण कोसळल्याने 42 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
अबिंग्टन टाउनशिप पोलिस विभागाने सांगितले की इमारत ताबडतोब रिकामी करण्यात आली. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झाले नाही.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाला सलाम केला, बदलापूरमध्ये विकास योजना जाहीर केल्या