Dharma Sangrah

पुन्हा माथेरानची राणी रुळावर

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:11 IST)

माथेरानची राणी   अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन दीड वर्षांनी ३० ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. अमन लॉज ते माथेरान अशी ट्रेन धावणार असून या मार्गादरम्यान रविवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. या मार्गावर ट्रेनच्या बारा फेऱ्या होतील. 

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन ही एक पर्वणीच होती. मात्र जानेवारी २०१६ ते मे २०१६ या काळात माथेरान मिनी ट्रेन अपघाताच्या सहा घटना घडल्या. दोन घटना तर रुळावरून घसरल्याच्या होत्या. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा मे २०१६ पासून बंदच ठेवण्यात आली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानंतर सुरक्षा उपाययोजनांसाठी एक समिती गठित करण्यात आली. या समितीने केलेल्या सुरक्षा उपाययोजनांपैकी नेरळ ते माथेरानपर्यंत संरक्षक भिंतीचे तसेच रुळांचे काम हाती घेण्यात आले. यातील अमन लॉज ते माथेरानपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर या दरम्यानची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य, नियम मोडल्यास कारवाई होणार... शिक्षणमंत्र्यांनी दिला इशारा

धुळ्याला 90 नवीन एसटी बसेस मिळाल्या; पालकमंत्र्यांच्या पुढाकाराला यश

LIVE: नागपूर जगातील सौरऊर्जेचे केंद्र बनणार

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महागणार, NHAI ने किती किंमत वाढवली जाणून घ्या

LPG संकटादरम्यान सरकारने नियम बदलले आहेत, वाचा नवीन आदेश काय आहे

पुढील लेख
Show comments