Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातून 800 कोटी रुपयांचे MD ड्रग जप्त, दोन जणांना अटक

arrested
, गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (14:35 IST)
गुजरात ATS ने महाराष्ट्रातील भिवंडी नदी नाका मधून एका फ्लॅट मध्ये छापा टाकून 10.9 किलोग्रॅम लिक्विड मेफेड्रोन आणि बैरल ने भरलेले 782.2 किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. 
 
याची आंतराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 800 करोड रुपये एवढी आहे. या ड्रग्सला बनवण्यासाठी ठेवलेल्या ग्राइंडर, मोटार, ग्लास फ्लास्क आणि हिटर देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच या संबंधित दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. 
 
बेकायदेशीरपणे मेफेड्रोन बनवण्यासाठी दोन आरोपींनी मागील नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये एका घर भाड्याने घेतले होते. व तिथे मेफेड्रोन बनवण्यासाठी रॉ मटेरियल सोबत इतर सामान एकत्रित करून केमिकल प्रोसेसिंग सुरु केली होती. या आरोपींची चौकशी केल्यानंतर समजले की, हे रूपी महाराष्टाच्या भिवंडीमधून ड्रग्ज बनवून सप्लाय करायचेत. गुजरात ATS ने टीम पाठवून छापा टाकला व 800 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करीत या आरोपींना अटक केली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मरेपर्यंत बहिणीचा गळा दाबून ठेवला, मेरठमध्ये ऑनर किलिंग