Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेरा बाप चोर है हे त्यांच्या कपाळावर लिहिलेलं असेल उद्धव ठाकरे यांनी टोला लावला

uddhav
, मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (08:14 IST)
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ज्या ज्या वेळी हे धनुष्यबाण हातात घेतील. त्या त्या वेळी त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल की ते चोर आहेत. ठाकरे म्हणजे मी एकटा नाही. माझ्यासमोर बसलेले हे सर्व ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार म्हणजे ठाकरे. तसेच ज्यांच्यावर संस्कार झालेले नसतात. त्यांना चोरीचा माल लागतो. बांडगुळ हे गळूनच पडतात. त्यांना पाडण्याची आवश्यकता नाही.
 
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, दुसऱ्याचा बाप चोरणारे हे आहेत. माझ्या वडिलांचा फोटो लावून तुम्ही जिंकला आहात. तुम्ही नाव चोरलंत. धनुष्यबाण चिन्हं चोरलं. पण तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घ्या. माझ्याकडे मशाल आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण विजयी होतं ते बघू.
 
संकटात संधी शोधतो
मी प्रत्येक संकटात शोधतो. या आधीही शिवसेनेवर संकटे आली. पण मी बिथरलो नाही. आताही बिथरणार नाही. आता आपली लढाई केवळ न्यायालयात नाही तर लोक न्यायालयातही आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
 
मि. इंडिया चित्रपटाची आठवण
मि. इंडिया चित्रपटात जसा मोगैंबो म्हणतो की, यांच्यात भांडण लावा. किमती वाढवा. म्हणजे सर्व विभागून जाईल आणि आपण आपले राज्य करायला मोकळे. तशी आता देशात परिस्थिती आहे. आपण आपला शत्रु ओळखायला हवा. कोण आहे आपला खरा शत्रु हे ओळखूनच आपल्याला रणनिती आखायची आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
नड्डांनी दिले आव्हान
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले होते की, या देशात केवळ भाजप हा एकमेव राजकीय पक्ष शिल्लक राहिल. पण तुम्ही जे कारस्थान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला नवीन उर्जा मिळाली आहे. शिवसेना देशभरात पोहोचली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधिमंडळात ६ हजार ३८३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर