Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील मुख्याध्यापका कडून बलात्कार

rape
, रविवार, 9 फेब्रुवारी 2025 (14:38 IST)
नाशिक जिल्ह्यातून एक लज्जास्पद बातमी समोर आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षाच्या  विद्यार्थिनीवर तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्या घरात बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, एका शाळेतील शिक्षकावरही या घटनेत सहभागी असल्याचा आरोप आहे. शनिवारी, पोलिसांनी एका खाजगी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवारी इगतपुरीतील आहे.इयत्ता सहावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन विद्यार्थिनीचे वर्ग शिक्षक तिला मुख्याध्यापकांच्या घरी घेऊन गेला तिथे मुख्याध्यापिकांनी तिच्यावर बलात्कार केला.  

नंतर पीड़ित मुलगी घरी आली.घरी आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागले. तिच्या कुटुंबियांनी तिला अस्वस्थ पाहून तिची विचारणा केली असता तिने घडलेले सर्व सांगितले. नंतर कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींच्या विरुद्ध तक्रार नोंदवली.
ALSO READ: नागपुरात 17 शाळकरी मुलींचा विनयभंग, पालकांच्या संतापानंतर तक्रार दाखल, आरोपीला अटक
पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकांच्या आणि वर्ग शिक्षकाच्या विरुद्ध बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी शाळेत निदर्शने केली असून मुलीला न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील चौकशी करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भरधाव वेगाने येणाऱ्या ऑटोरिक्षा उलटल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, डोंबीवलीतील घटना