Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी कन्नड आमदार हर्षवर्धन जाधव यांची तुरुंगात रवानगी

arrest
, बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (19:20 IST)
सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी कन्नड आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाच्या आदेशावरून नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी अटक केली. 
मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि एका पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाने दणका दिला आहे. हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूरमधील सोनेगाव पोलिसांनी अटक केली.
तसेच छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी जाधव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना संध्याकाळी मेयो रुग्णालयातून ताब्यात घेतले आणि थेट मध्यवर्ती कारागृहात पाठवले. जाधव यांना आता किमान २ रात्री तुरुंगात काढावे लागण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव थोड्यावेळातच होणार जाहीर