Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार गटाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकी दिली

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (18:37 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत असून सर्व पक्ष तयारीला लागले आहे. जागावाटपाच्या संदर्भात अद्याप बैठका सुरु आहे. सध्या नेत्यांची वक्तव्ये आणि असभ्य वर्तन चर्चेत आहे. भंडारा येथील तुमसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे आमदार राजू कॉरमोर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ते एका महिला अधिकाऱ्याला धमकावत आहे. ही ऑडिओ क्लिप 28 सप्टेंबरची आहे. 

सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्रात जन सन्मान यात्रा काढत आहेत. यावेळी ते एका कार्यक्रमासाठी भंडारा जिल्ह्यात पोहोचले होते, मात्र नगरपरिषदेच्या सीओ करिश्मा वैद्य कार्यक्रमापूर्वी कार्यक्रमस्थळी न पोहोचल्याने आमदार राजू कोरमोर संतप्त झाले आणि त्यांनी महिला अधिकाऱ्याला फोनवर खडसावले.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहे काल पाऊस झाला आणि कार्यक्रमस्थळी पाणी साचले आहे. तुम्ही किंवा तुमचा कोणीही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. आणि धमकावत शिवीगाळ केली.
 
ते म्हणाले, मॅडम तुम्ही माझ्या सोबत बदल घेण्याची भावना ठेवत आहे.आमच्या कार्यक्रमाचा पूर्णपणे सत्यानाश झाला. तुमच्या एकही कर्मचाऱ्यांनी आम्हाला मदत नाही केली. हे तुम्हाला महागात पडणार आहे. आमच्यात काम करण्याची ताकद आहे. तुम्ही भिकारी आहात. तुम्हाला विकार आहे. जास्त बोलू नका, मी तुम्हाला निपटवून दाखवतो.अशा प्रकारे आमदार कारेमोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना कॉल करून धमकी दिली. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून. कारेमोरे यांची सर्वत्र टीका होत आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: बंटेंगे तो कटेंगे घोषणे वर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रया

बंटेंगे तो कटेंगे घोषणे वर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रया

लाडली बहन योजनेचे फॉर्म ऑफलाइन घेता येत नाहीत', महाराष्ट्र सरकार असे का म्हणाले

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडीची मोठी कारवाई 23 ठिकाणी धाड़

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देणार -काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे

पुढील लेख
Show comments