Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अश्विनी भिडे यांची बदली, रणजीतसिंग यांच्याकडे मेट्रो ३ची जबाबदारी

mmrc-chief-ashwini-bhide-transferred
, बुधवार, 22 जानेवारी 2020 (10:09 IST)
मेट्रो ३च्या प्रकल्पावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रणजीतसिंग देओल यांना आणण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंग हे आता अश्विनी भिडे यांच्या जागी मेट्रो ३ चा कार्यभार पाहतील. त्यांना अद्याप कोणताही पदभार देण्यात आलेली नाही.
 
आरे येथील प्रस्तावित मेट्रो ३ च्या कारशेडचं अश्विनी भिडे यांनी समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आरे कारशेडला विरोध दर्शवला आहे. दरम्यान या कारशेडचं समर्थन करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे.
 
राज्यातील ठाकरे सरकारने सनदी अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांना मेट्रो ३ च्या संचालक पदावरुन हटवलं आहे. भिडे यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. मात्र त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यात आला नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मुंबई' राज्यातील सर्वात प्रदूषित शहर