Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरमध्ये

MNS delegation
Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (16:30 IST)
मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. बीकेसीतल्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे डॉक्टर, कर्मचारी आहेत असा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला होता. यानंतर आठवडाभराचे अल्टिमेटमही कंत्राटदारांना देण्यात आले होते परंतु वेळ देऊनही सुविधा उपलब्ध केल्या नसल्यामुळे कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. यावेळी कंत्राटदाराला जाब विचारताना बाचाबाची झाली आहे.
 
बीकेसी कोविड सेंटरमध्ये आठवड्याभरात डॉक्टरांची नेमणूक करावी तसेच या सर्व प्रश्नांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पण तयार आहोत. सगळ्या पेशंटच्या इथे कॅमेरे लावले आहेत. परंतु आपल्या पेशंटसोबत काय होतंय हे बाहेरच्या लोकांना कळतं नाही त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेरांचा एक्सेस रुग्णाचा नातेवाईकांना द्यावे जेणेकरून आतमध्ये काय सुरु आहे हे त्यांना कळेल अशी महत्त्वाची मागणी आहे. यासंदर्भातील पत्र मनसेचे अखिल चितळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. डेरेंनाही दिले होते परंतु यावर अद्याप कोणाकडूनही स्पष्टिकरण आले नाही यामुळे शेवटी मनसेचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरवर दाखल झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

आईने मुलीचा गळा दाबला, भावाने गळा कापला, धड नाल्यात आणि डोके कालव्यात फेकण्यात आले

पंतप्रधान मोदींनी केले जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन, कटरा ते श्रीनगर प्रवास सोपा होणार

महाराष्ट्रातील ९०३ प्रकल्पांवर ब्रेक! पैशांअभावी प्रकल्प मंजुरी रद्द करावी लागली का?

LIVE: नागपूर रहिवासी सुनीताच्या फोनमध्ये संशयास्पद सॉफ्टवेअर आढळले, दोन पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले

सुनीता पाकिस्तानी गुप्तहेर आहे का? फोनमध्ये संशयास्पद सॉफ्टवेअर आढळले, दोन पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले

पुढील लेख
Show comments