Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

केईएम रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी असे नाव द्या: मनसे

केईएम रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी असे नाव द्या: मनसे
'केईएम'ला डॉ. जोशी यांचं नाव देण्याची मागणी करणारं निवेदन मनसेनं याआधीही दिलं होतं. आज डॉ. जोशी यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त मनसेनं या मागणीचं पालिकेला स्मरण करून दिलं आहे. आज मनसे ने पुन्हा एकदा मुंबईतील या प्रसिद्ध हॉस्पीटलला जोशी यांचे नाव द्यावे असे पुन्हा एकदा निवेदन दिले आहे. 

परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी मनसेनं पुन्हा मुंबई महापालिकेकडं केली आहे. 'केईएम'ला डॉ. जोशी यांचं नाव देण्याची मागणी करणारं निवेदन मनसेनं याआधीही दिलं होतं.

आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याणमध्ये झाला.लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली आणि आनंदीबाईंनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.१८८३ म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये प्रवेश मिळाला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी मिळवली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअर इंडिया शेअर विक्री हा तर महाघोटाळा: स्वामी