मुंबईतील परळ येथील बाई जेरबाई वाडियाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून तीन दिवस धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात आता मनसेनेही सहभाग घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलीताई ठाकरे आणि मनसेचे जेष्ठ नेते बाळ नांदगावर यांनी आंदोलनात सहभाग घेत आपली भुमिका स्पष्ट केली.
‘वाडिया बंद होणार नाही. कर्माचाऱ्यांपेक्षा इथे येणारे रूग्ण जास्त महत्त्वाचं आहे. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या त्यांचे मुल वाडियात अॅडमिट होते आणि ते गेले. तेव्हापासून गेले १५ दिवस आम्ही या गोष्टीचा पाठपुरवठा करत आहोत. सीईओ ना भेटलो, महापालिकेत पडवळ यांना जाऊन भेटलो पण काहीच मार्ग न निघाल्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आता लवकरात लवकर आजित दादांना जाऊन भेटणार आणि वाडियासाठी अनुदान लवकरात लवकर द्या अशी मागणी करणार असल्याचे शर्मिला ठाकरे म्हणाल्या’.