Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवर भव्य मेळाव्याचे आयोजन

Webdunia
सोमवार, 14 मार्च 2022 (15:05 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्क येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र आगामी मुंबई, नाशिक, पुण्यासह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे, याच सर्व घडमोडींवर चर्चा करण्यासाठी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची बैठक पार पडली. वांद्र्यातील एमआयजीमध्ये झालेल्या या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन केले आहे. यावेळी गुढीपाडव्याला मनसे शिवतीर्थावर मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
 
या बैठकीत 21 मार्चला मनसे शिवाजी पार्कवर तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच शिवतीर्थावर मनसे मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः हजर राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालणार असल्याचेही म्हटले जातेय. राज्यातील पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे यंदा गुढीपाडवा सण मोठ्या दणक्यात साजरा करणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृपक्षात पितरांसाठी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे का बनवले जातात?

जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध करता येते का? स्वतःचे श्राद्ध कधी करावे

पितृपक्ष 2025: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग, श्राद्ध विधी कधी करावे हे जाणून घ्या

डोक्याला मेंदी लावण्याचे 5 सौंदर्य फायदे जाणून घ्या

सावधगिरी बाळगा! या 7 चुकांमुळे तुमची हाडे कमकुवत होत आहेत

सर्व पहा

नवीन

पुण्यात मुसळधार पाऊस, पूरग्रस्त गावातून 70 जणांची सुटका

UAE vs OMN T20 : UAE ने ओमानचा 42 धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदवला

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबा पसरला, 18 जणांचा मृत्यू, 76 प्रकरणे आढळली

इंदूरमध्ये ट्रकने पादचाऱ्यांना चिरडले, 4 ते 5 जणांचा मृत्यू, संतप्त लोकांनी ट्रकला पेटवले

मतचोरीची' ठिणगी महाराष्ट्रात पोहोचली,नाशिक युवा काँग्रेसने मोहीम सुरू केली

पुढील लेख
Show comments