Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली

Webdunia
शुक्रवार, 20 मे 2022 (10:50 IST)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ते येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र त्यांनी हा दौरा स्थगित केला असून त्याची माहिती ट्विट करून दिली. अयोध्येचा दौरा स्थगित केला, यावर सविस्तर माहिती पुण्यात रविवारी होणाऱ्या सभेत बोलू असे ट्विट केले आहे.

<

#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1

— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022 >मनसेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु केली होती. अनेक शहरांमधून अयोध्या जाण्यासाठी रेल्वेच्या बोग्यांची बुकींग करण्यात आले होते. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते जाणार होते. मात्र  भाजपचे खासदार बृज भूषण यांनी राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांचा अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. तसेच काही साधू संत यांनीही या दौऱ्यास विरोध आहे. बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनीही या दौऱ्यालाही विरोध केला होता.
 
राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत हा दौरा स्थगित झाला असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. आता मात्र राज ठाकरे रविवारी पुण्यात काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
 

संबंधित माहिती

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments