मुंबई- ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आता पर्यंत सहा लोकांची मृत्यू झाली आहे. ज्यामुळे राज ठाकरे यांची पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबई स्थित पीडब्लूडीच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.
एमएनएस वर्कर्सने पीडब्लूडी ऑफिसात ठेवलेले फर्निचर तोडले. कार्यकर्त्यांनी कॉम्प्युटर आणि LED टीव्हीदेखील उचलून फेकले. तोडफोड केल्यानंतर कार्यकर्ता नारे लावत तेथून निघून गेले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे रस्ते पूर्णपणे खड्ड्यांमध्ये परिवर्तित झाले असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत असलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना प्राण देखील गमावावे लागले आहेत. म्हणून सरकार आणि प्रशासनाला खड्डे दिसत नसतील तर किमान आंदोलन तरी दिसेल, अशी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांनी तोडफोडीच समर्थन केले आहे. खड्डे भरले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
दुसरीकडे महाराष्ट्र रस्त्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी स्पष्ट केले आहे की या मृत्यूंसाठी खड्डे जवाबदार नाहीत. मुंबईत रोज लाखो लोकं प्रवास करतात त्यांना तर काही होत नाही. अपघातामुळे मृत्यू झाली असून त्यांच्याप्रती सरकारला सहानुभूती आहे आणि कोणी दोषी असल्यास कारवाई नक्की केली जाईल.