rashifal-2026

मोहित कंबोज यांच्या अडचणी वाढल्या

Webdunia
सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (09:56 IST)
भाजप नेते मोहित कंबोज यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियातील १०३ कोटी रुपयांच्या घोटाळ््या प्रकरणी सीबीआयने खटला बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
 
सीबीआयने त्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने फेटाळला असून संबंधित प्रकरण पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केले आहे. प्रकरण नव्याने ऐकण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. प्रकरण पुन्हा नव्याने ऐकले जाणार असल्याने कंबोज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज व इतर काही जणांनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोप आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

गुजरातमधील वलसाड येथे भीषण रस्ता अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

पुढील १६ तासांत ९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता; आयएमडीने अलर्ट जारी केला

LIVE: मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला, कर बेकायदेशीर घोषित केले

प्रत्येक बैठकीला राजकीय वळण देऊ नका, उद्धव ठाकरेंच्या नाराजीवर राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments