संकटाच्या काळात एक दिलासादायक बातमी म्हणजे मान्सूनच्या आगमनाची. येत्या दोन ते तीन दिवसात मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतात, असे हवमान खात्याच्या वतीनं सांगण्यात येत आहे.
10 जूनपर्यंत कोकणातून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर, येत्या 48 तासांत बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 9 ते 11जूनपर्यंत ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 10 ते 11जून रोजी पाऊस गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल होऊ शकतो. बिहारमध्ये 15 ते 20 जून रोजी धडकण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये 15 तर दिल्लीत 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो.