Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Monsoon : मुंबई व पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

rain
, रविवार, 25 जून 2023 (13:09 IST)
येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे.
 
पुढील पाच दिवस हवामानाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊसा आज शहरात दाखल झाले असून पावसाचा जोर वाढला आहे. पहिल्याच पावसामुळे मुंबई तुंबली आहे. राज्यातील वाशीम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, पालघर, वसई, कोल्हापूर, विरार, या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर हळूहळू वाढेल. पुढील 5 दिवसांत हवामान आणखी बिघडण्याचा अंदाज आहे." मुंबई,पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रायगड आणि रत्नागिरी मध्ये पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. 
मान्सूनची शहराकडे वाटचाल
यलो अलर्ट म्हणजे लोकांना हवामानाबाबत अपडेट राहण्यास सांगितले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मोसमी पावसाने शहराच्या दिशेने आगेकूच केल्यामुळे शनिवारी पहाटे मुंबईच्या काही भागात पाऊस झाला.
 
24 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल
हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की मान्सून 24 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, परंतु औपचारिक घोषणा अद्याप व्हायची आहे. IMD मुंबईने यापूर्वी सांगितले होते की, मान्सून रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघरच्या दिशेने पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. मान्सून 24 जूनपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
 
साधारणपणे, मुंबईत मान्सून अधिकृतपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. IMD ने 18 जून रोजी देशात मान्सून सुरू होण्याबाबत अपडेट केले होते.
 
आयएमडीने यापूर्वी सांगितले होते की मान्सूनला उशीर झाल्यामुळे काही दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची कमतरता निर्माण झाली आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यांमध्ये प्रवेश केल्यामुळे इतर राज्यांमध्ये अधिक पावसाची अपेक्षा आहे.
 



Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वच खेळाडू अपयशी, पण पुजारा होत आहे बळीचा बकरा; सुनील गावस्कर सिलेक्टर्सवर चिडले