Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माय लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू

Webdunia
मंगळवार, 4 जानेवारी 2022 (10:39 IST)
नागपूरहूनरेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने जातअसलेल्या माय लेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी रेल्वे कर्मचार्‍यांमुळे समोर आली आहे. पूजा इशांत रामटेके वय 27 व अथर्व इशांत रामटेके वय 18महिने हे मृत माय लेकाचे नाव आहे. 
 
सैनिक असलेला इशांत रामटेके टेकानाका नागपूर हा सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासात असतानाा पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दीड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे गेली. त्यावेळी मुलगा धावत धावत समोर गेला.काही कळण्याच्या आतच    मागडी व देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरून नदीत पडला. मुलाला वाचविण्‍याच्या प्रयत्नातमहिलेचा तोल जावून ती सुद्धा रेल्वे पुलावर कोसळली. या घटनेत दीड वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर महिलेला पुलाचा मार लागून लटकलेल्या स्थितीत ठार झाली. ही घटना रात्रीदरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

नवीन

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; हा असेल अजेंडा

समय रैना यांनी महाराष्ट्र सायबर सेलवर विनोद केला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हसू आवरू शकले नाहीत

भाचीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाची निघृण हत्या; मामा पोलिसांच्या ताब्यात

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर ४ हल्लेखोरांनी झाडल्या २० गोळ्या

पुढील लेख
Show comments