Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण

MP Dr. Amol Kolhe infected with corona Maharashtra News Retgional News In Marathi Webdunia Marathi
, शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (15:35 IST)
खासदार कोल्हेंनी स्वत: ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच त्यांचा संपर्कात आलेल्या सर्वांना आपली कोरोना चाचणी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. त्यामुळे त्यांचा शिरुर मतदारसंघाचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. 
 
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत लिहिले की, कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसां पासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. करोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.परंतु प्रकृती स्थिर आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांवर वैद्यकीय उपचार सुरु केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे.”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मला कृष्णकुंजवर न्याय मिळणार’,संजीवनी काळे यांनी व्यक्त केली आशा