Marathi Biodata Maker

MPSC साठी अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार

Webdunia
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या निकषात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी एका पदासाठी 12 उमेदवार पात्र ठरविले जायचे. आता एकूण पदांच्या 16 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार असून, त्याचा मोठा फायदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांना होणार आहे. नव्या निर्णयानुसार मुख्य परीक्षेत उमेदवारांची संख्या वाढणार असली तरी गुणवत्तेची स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरतीसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये पुर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. आतापर्यंत जेवढी पदे आहेत, त्याच्या 12 पट विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविले जात होते. त्यानुसार या परीक्षेतील गुणांचे कट ऑफ ठरविले जात होते. आता पात्रतेचा हा निकषच बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यापुढील परीक्षांसाठी एकूण पदांच्या 15 ते 16 पट उमेदवारांना पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेचे कटऑफ तुलनेने काही प्रमाणात खाली येणार असल्याने मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

जागतिक हवामान दिन कधी आणि का साजरा केला जातो, महत्त्व जाणून घ्या

कोनेरू हम्पी कॅन्डिडेट्स स्पर्धेत खेळणार नसल्याने सुरक्षेबाबत चिंता वाढली

दक्षिण पॅसिफिक महासागरात भूकंपाचे धक्के जाणवले, तीव्रता जाणून घ्या

मोहन भागवत यांनी गंगाधर राव डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन केले

LIVE: मोहन भागवत यांनी गंगाधर राव डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन केले

पुढील लेख
Show comments