Dharma Sangrah

MPSC परीक्षा ! तर उमेदवारांना मिळणार 'ही' सुविधा

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (08:11 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकललेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी (दि. 21) रोजी होणार आहे. प्रशासनाने या पूर्व परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक एमपीएससीने जाहीर केले आहे.
 
ज्या विद्यार्थ्यांना कोविड सदृश्य लक्षणे आढळून आलेली आहेत, त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच उमेदवारांना एमपीएससीकडून मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहे.
 
परीक्षा केंद्रात येताना उमेदवाराने तीन पदरी कापडाचे मास्क किंवा पट्टी बांधावी लागणार आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे गरजेचे आहे.
 
ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. स्वतःचा जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
 
राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर आहेत. त्यामुळे उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता येणार नाही. तसेच उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. तसेच सुरक्षित अंतर पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात लाच घेताना तुरुंगातील सुभेदार आणि कॉन्स्टेबलला अटक

पालघर केमिकल युनिटमध्ये विषारी गॅस गळती; २,५०० हून अधिक लोकांना बाहेर काढले

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली

स्मृती मानधनाचे आयसीसी रँकिंगमध्ये वर्चस्व प्रस्थापित झाले; पुन्हा एकदा नंबर १ फलंदाज बनली

पश्चिम आशियातील युद्धादरम्यान इराणमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

पुढील लेख
Show comments